Nitesh Rane | आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात – नितेश राणे
Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. अजित पवार गट सत्तेत आल्यानं भाजप आणि शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
I have supported Ajit Pawar. However, I am not a BJP campaigner – Amol Mitkari
“मी अजित पवारांना समर्थन दिलं आहे. मात्र, याचा अर्थ मी भाजपचा प्रचारक असेल किंवा भाजप सत्तेवर जाण्यासाठी मी प्रयत्न करेल असा नाही”, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं होतं. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि अजित पवार गटात मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नेत्यांनी (Nitesh Rane) प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “आत्ताच कुठेतरी वाचलं मिटकरी म्हणतो मी भाजपचा प्रचार करणार नाही…हा कोण आहे?? आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात.भलताच कॉन्फिडन्स असतो काही लोकांना.
आत्ताच कुठेतरी वाचलं मिटकरी म्हणतो मी भाजपचा प्रचार करणार नाही…
हा कोण आहे?? आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात.
भलताच कॉन्फिडन्स असतो काही लोकांना.— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 14, 2023
दरम्यान, भाजप-शिंदे सरकारमध्ये अजित पवार गट सामील झाल्यानंतर खातेवाटप आणि मंत्रिमंडळ (Nitesh Rane) विस्ताराचा गुंता वाढला असल्याचं बोललं जात आहे.
हा गुंता सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दररोज बैठका होत आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली होती.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | ठाकरे-शिंदे पुन्हा येणार आमने-सामने! एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा मेळावा
- Rohit Pawar | महिलांची सुरक्षा करता येत नसेल तर सरकारला क्षणभरही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही – रोहित पवार
- Sanjay Raut | काल ठाण्यात दोन हास्यजत्रेचे शो पाहायला मिळाले; शिंदे-फडणवीसांच्या बैठकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
- Rahul Narwekar | 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला गती! न्यायालय आज नार्वेकरांना काय आदेश देणार?
- Devendra Fadnavis | शिंदे गटात नाराजी? शिंदेंच्या बैठकीत रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांची हजेरी
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3XQCCYd
Comments are closed.