Nitesh Rane | “एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यावर मविआने टीका करणं म्हणजे…”, नितेश राणेंचा हल्लाबोल
Nitesh Rane | मुंबई : टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पलटवार केला आहे. राणे-ठाकरे कुटुंबांमध्ये आधीच वाद पेटलेले असताना नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे.
वर्षभरापूर्वीच गुजरातला गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचं वाटोळे केलं आणि आता उलटा कांगावा सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठवले नाही. वा कोणता पाठपुरावा केला नाही. या वस्तुस्थितीची माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये, असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात जी काही गुंतवणूक येणार होती, ती इतर राज्यात गेली आहे. कदाचित इतर राज्यात निवडणुकीसाठी ही गुंतवणूक गेली असेल, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच तिकडे अजून काही चांगलं द्यायचं असेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले. उद्योजकांना या सरकारवर विश्वास नाही, गुंतवणूकदारांचा या सरकारवर विश्वास नाही, थोड्या दिवसाचं हे सरकार आहे. त्यांच्या अंतर्गत धूसफुस सुरू झाली आहे. एका व्यक्तीच्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी राज्याचं नुकसान होत आहे, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | टाटा-एअरबस प्रकल्प वादावर शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर; म्हणाले…
- Skin & Hair Care Tips | कढीपत्ता वापरून चेहरा आणि केसांना होऊ शकतात ‘हे’ फायदे
- Milind Narvekar | … म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवण्यात आली, खरं कारण आलं समोर
- Rohit Sharma | “युवराज सिंग माझ्यावर नाराज” ; रोहित शर्मा असं का म्हणाला?
- Anushka Sharma | कोलकत्याच्या काली घाट मंदिराजवळ मुलगी वामिका सोबत दिसली अनुष्का शर्मा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.