Nitesh Rane | एक जायेगा तो सब जायेंगे; किरीट सोमय्या प्रकरणावरून नितेश राणेंचं सूचक विधान

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणावरून विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

या प्रकरणावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना नितेश राणे उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) खोचक टीका केली आहे.

Ek jayega apne dhande me to sab jayenge – Nitesh Rane

किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

पण ‘सत्या’ चित्रपटातील एक चांगला डायलॉग आहे, ‘एक जायेगा अपने धंदे मे तो सब जायेंगे’ हे फक्त किरीट सोमय्या यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं. किरीट सोमय्या यांनी केलेल्या मागणीनुसार तपास झाल्यावर या प्रकरणाची शहानिशा होईल. त्यानंतरच आपण या प्रकरणावर बोलू.”

यावेळी बोलत असताना नितेश राणेंनी (Nitesh Rane) विरोधकाच्या बैठकीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले “ज्या काँग्रेस पक्षानं बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला होता.

त्याच काँग्रेस पक्षाबरोबर बाळासाहेबांचा मुलगा आज मांडीला मांडी लावून बसला आहे. उद्धव ठाकरेंचं आपल्या वडिलांवर खऱ्या अर्थानं प्रेम असतं, तर ते त्या बैठकीला गेलेच नसते.”

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी देखील या व्हिडिओ प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे.

“मी अनेक महिलांवर अत्याचार केले अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्यांचे अनेक व्हिडिओ क्लिप आहे असे दावे केले जातात.

मात्र माझ्याकडून कोणतेही महिलेवर अत्याचार झालेला नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे या सर्व आरोपाची चौकशी करावी अशी माझी आपणास विनंती आहे”, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43zVsUK