Nitesh Rane | “एक रुपयाचीही कमाई नसताना उद्धव ठाकरे…”; नितेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात
Nitesh Rane | सिंधुदुर्ग: बीडमध्ये झालेला ठाकरे गटाचा वाद चांगलाच तापला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना दोन चापट्या लगावल्या असल्याचा व्हिडिओ आप्पासाहेब जाधव यांनी स्वतः शेअर केला. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहे. त्याचबरोबर या प्रकरणावर बोलताना नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) घणाघात केला आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करत नितेश राणे म्हणाले, “जसा पक्षप्रमुख आहे तसेच कार्यकर्ते. उद्धव ठाकरेंनी आयुष्यामध्ये हेच केलं आहे. एक रुपयाचीही कमाई नसताना ते आलिशान आयुष्य कसं काय जगतात? मातोश्रीमध्ये एसी कोणत्या कंपनीचे आहेत. व्हिडिओकॉन कंपनीचे एसी मातोश्रीमध्ये लावलेले आहेत. व्हिडिओकॉन कंपनीचे मालक कोणाचे खासदार होते? त्याचबरोबर परदेशी दौऱ्यात उद्धवजींच्या खिशातून एक रुपयाही जात नाही. सुषमाजी अजून काय वेगळं करणार, त्याचबरोबर संजय राऊत अजून काय वेगळं करणार? महाराष्ट्राला दरोडेखोर म्हणून लुटतात आणि मग दुसऱ्यांवर आरोप करतात?”
बीडमध्ये झालेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत नितेश राणे म्हणाले, “सुषमाताई आमच्या कितीही देवी देवतांवर बोलल्या आमच्यावर किती आरोप केले, तरी त्यांच्यावर झालेल्या मारहाणीचा आम्ही समर्थन करत नाही. मात्र, त्यांच्यावर झालेले आरोप आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ऑफिससाठी सोपा आणि एसीसाठी त्या पैसे मागत होत्या.”
दरम्यान, सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. सध्या सुषमा अंधारे बीड दौऱ्यावर आहेत. जाधव यांनी अंधारेंवर मारहाण झाल्याचा आरोप केला. मात्र, मला मारहाण झालेली नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहे.
महत्वाच्या बातम्या
- Samana Editorial | “स्वतःला हिंदुत्ववादी वगैरे म्हणून घेणाऱ्या…”; सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र
- Sanjay Raut | “कुणाचा पोपट उडतोय…”; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
- Jitendra Awhad | शरद पवारांना ड्राम्याची गरज नाही; जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
- Sushma Andhare | सुषमा अंधारेंवर मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या ‘त्या’ जिल्हाप्रमुखांवर उद्धव ठाकरेंची कारवाई
- Sushma Andhare | “मला मारहाण…”; मारहाणीच्या प्रकरणावर सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3WxZXO1
Comments are closed.