Nitesh Rane | टाटा एअरबस प्रकल्पावरून नितेश राणेंचा ‘मविआ’वर गंभीर आरोप, म्हणाले…
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन (Vedant Foxcon) प्रकल्पानंतर आता C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प गुजरात राज्यामध्ये गेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते शिंदे-फडणवीस सरकारवर टीका, टिपण्णी करत आहेत. अशातच भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला असल्याचं समजतं आहे.
काय म्हणाले नितेश राणे (Nitesh Rane)
सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर चांगलाच निशाणा साधला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतील मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशांत राबवला गेला. विमान निर्मितीच्या या प्रकल्पासाठी 8 सप्टेंबर 2021 रोजी एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. एअरबस आणि टाटा यांच्यातील करारानुसार संयुक्तपणे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पास संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्याचे रतन टाटा यांनी त्याच दिवशी जाहीरही केले होते. हे सगळं झाले असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठवले नाही. वा कोणता पाठपुरावा केला नाही.
या वस्तुस्थितीची माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये, मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असं आव्हानच राणे यांनी मविआच्या नेत्यांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- CNG Car Update | जबरदस्त मायलेजसह कमी किंमतीत उपलब्ध आहेत ‘या’ CNG कार
- Rohit Pawar | “ज्यांना हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हे माहिती नाही…”, रोहित पवारांनी घेतला तानाजी सावंतांचा समाचार
- Virat Kohli । पाकिस्तानी चाहत्याने वाळूवर रेखाटलं विराट कोहलीच चित्र
- Rohit Pawar | “हिंमत असेल तर पुरावा द्या..मैदानात बघू”; रोहित पवारांचे ‘या’ नेत्याला आव्हान
- MVA | “नार्वेकर यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी…”; महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्याचा शिंदे सरकारला टोला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.