Nitesh Rane | …तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही : नितेश राणे

Nitesh Rane | त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरून (Trimbakeshwar Temple Case) चांगलचं वातावरण तापलं आहे. यामध्ये राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महाद्वारासमोर धूप दाखवण्याची प्रथा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर भाजप ( BJP) या प्रकरणी चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली. या प्रकरणी आज ( 23 मे) भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंदिरात जाऊन महाआरती देखील केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज ठाकरेसह (Raj Thackeray) त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे.

Land Jihad in Maharashtra – Nitesh Rane

नितेश राणे ( Nitesh Rane) म्हणाले की, मी आरती करायला आलो आहे. आमच्या धर्मामध्ये आरती करणं, आमची जबाबदारी असून तो आमचा हक्क आहे. तसचं “धर्मावर होणारे अन्याय आम्ही थांबवू शकलो नाही, तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही”. असं नितेश राणे म्हणाले. याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी संदेश देण्यासाठी आणि आमच्या धर्मावर जे काही हल्ले होत आहेत ते थांबवण्यासाठी आलो आहोत. जे काही लॅन्ड जिहाद महाराष्ट्रामध्ये चालू केलं आहे ते लवकरात- लवकर बंद करा नाहीतर त्याच काय करायचं ते आम्ही बघू. असा इशारा देखील नितेश राणे ( Nitesh Rane) दिला.

Nitesh Rane Commented On Trimbakeshwar Temple Case

दरम्यान, नितेश राणे ( Nitesh Rane) यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) याचं नाव घेत म्हटलं की, आम्ही राज ठाकरेंना क्रॉस करणार नाही. परंतु, त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलं आहे की, हिंदू शिवाय इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणी ढवळाढवळ करू नये. असं देखील नितेश राणे म्हणाले. याचप्रमाणे या प्रकरणी सर्व चौकशी लवकरच होणार आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले असून काही धागे- दोरे देखील हाती लागले आहे. यामुळे ज्यांनी जबरदस्ती मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर लवकरात – लवकर कारवाई होईल. असं नितेश राणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45i7LXU