Nitesh Rane | तुम्ही ग्रामपंचायतीत उभे रहा मग बघू हवा कशी निघते ; नितेश राणेंचा संजय राऊतांना खोचक टोला
Nitesh Rane | मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप समर्थित उमेदवारांनी 3,500 हून अधिक जागा जिंकल्या, तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या समर्थकांनी 1,000 हून अधिक जागा जिंकल्याचा दावा केला. काँग्रेसने भाजपचा हा दावा फेटाळून लावला आणि एकट्या काँग्रेसमधून सर्वाधिक 900 सरपंच निवडून आल्याचे सांगितले. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. राऊतांच्या टीकेवर नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.
“एक दिवस अगोदरच आम्हीच पहिल्या नंबरवर आहोत, असे म्हणणाऱ्या मंडळींनी राज्यातील त्यांचे सरपंच आणि सदस्य यांची यादी जाहीर करावी, म्हणजे प्रश्न मिटला. जोरात खोटे बोलल्याने काही काळ भ्रम निर्माण होईल. ग्राम पंचायत निवडणुका चिन्हावर लढत नाहीत. तेव्हा उगाच आकडा लावून काय करणारं?”, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
तुम्ही जरा एक ग्रामपंचायतीत उभे रहा मग बधु.. हवा कशी निघते..
— nitesh rane (@NiteshNRane) December 21, 2022
यावर नितेश राणे म्हणाले, तुम्ही जरा एक ग्रामपंचायतीत उभे रहा मग बघू, हवा कशी निघते. बावनकुळे यांनी दावा केला की, भाजप समर्थित उमेदवारांनी 3,500 हून अधिक जागा जिंकल्या आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या पाठिंब्याने 1,000 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेचा शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर विश्वास असल्याचे निकालावरून दिसून आले. संपूर्ण राज्याचे भगवेकरण होत असून हा भाजपचा ऐतिहासिक विजय असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात अधिकृत घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १३०० ग्रामपंचायतीवर आणि महाविकास आघाडीचे इतर दोन घटक पक्ष लक्षात घेता २६५१ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला.
शिवसेना आणि भाजप यांच्या मिळून साधारणपणे २२०० ग्रामपंचायतीवर झेंडा फडकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ग्रामीण भागातील जनतेने फार मोठ्याप्रमाणावर साथ दिली आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे त्यामुळे आपल्या लक्षात येईल की दलबदलूचे राजकारण महाराष्ट्र मान्य करत नाही. साम-दाम-दंड-भेद वापरून, सत्ता वापरून, सत्तेचा दुरुपयोग करून देखील महाविकास आघाडीचा पराभव भाजप व शिंदे गट करु शकत नाही हे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात सिद्ध झाले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- MPSC Recruitment | खुशखबर! एमपीएससीमार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Kapil Dev | कपिल देव यांनी खेळाडूंवर केली वादग्रस्त टीपणी, म्हणाले…
- Coronavirus | जगात अनेक ठिकाणी पुन्हा कोरोनाचा कहर, तर भारतात ‘ही’ स्थिती
- PAK vs ENG | पाकिस्तान संघामध्ये मोठं चक्रीवादळ येण्याची शक्यता, ‘या’ खेळाडूंवर होऊ शकतात परिणाम
- Maharashtra Weather Update | राज्यात थंडीत वाढ, तर तापमानात घट
Comments are closed.