Nitesh Rane | “तू सरपंच तरी…”; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

Nitesh Rane | नाशिक: नागपूरमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होऊ शकतो का? अशा शब्दात नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

Nitesh Rane taunts Aditya Thackeray

आदित्य ठाकरे यांचे नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. या प्रकरणी प्रतिक्रिया देत असताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “वडिलांची सर्जरी होत असताना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनायचे स्वप्न बघत होता. एका बाजूला वडील बेडवर आणि दुसऱ्या बाजूला या महाशयांना मुख्यमंत्री बनायचं होतं. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात महाविकास आघाडीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर तुमचा पक्ष आहे. तर तू सरपंच तरी बनू शकतो का?”

पुढे बोलताना ते (Nitesh Rane)  म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस छोटा भाऊ आणि मोठा भाऊ असले तरी शिवसेना महाविकास आघाडीतील सावत्र भाऊ आहे. शिल्लक सेनेला असंच उचलून आणून घरात बसवलं आहे.”

दरम्यान, नागपूरमधील रामटेक आणि कन्हान रोडवर हे पोस्टर लावण्यात आले होते. ‘भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत’, असा उल्लेख या पोस्टर्समध्ये करण्यात आला होता. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे पोस्टर लावले होते.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Mrm0Bb