Nitesh Rane | “त्र्यंबकेश्वरमध्ये धूप दाखवण्याची परंपरा…”; नितेश राणेंचा खुलासा

Nitesh Rane | नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 13 जून रोजी मुस्लिम समाजातील भाविकांकडून मंदिरात धूप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला होता. मंदिरामध्ये धूप दाखवण्याची आमची परंपरा खूप जुनी आहे, असे स्पष्टीकरण मंदिरात शिरणाऱ्यांनी दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अशी कोणतीही परंपरा नसल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Nitesh Rane’s disclosure about the tradition of Trimbakeshwar temple

नितेश राणेंनी (Nitesh Rane) आज नाशिकला जाऊन त्रंबकेश्वर मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला. नितेश राणे म्हणाले, “या परिसरातील शांतता भंग करण्याचा आमचा हेतू नव्हता. मात्र, 13 मे रोजी घडलेल्या घटनेवरून जे काही गैरसमज पसरले होते, त्यामध्ये हिंदूंची बदनामी होत होती. म्हणून आज मी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहे. उरूस निघाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ धूप दाखवण्याची परंपरा आहे, असंच म्हटलं जात होतं. परंतु ग्रामस्थ आणि विश्वस्तांशी बोलल्यानंतर कळालं की इथे अशी कोणत्याही पद्धतीची परंपरा नाही.”

पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “उरुस मंदिराच्या बाहेरील परिसरात निघतो. ते लोक धूप दाखवतात? की काय करतात तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र 13 मे रोजी मंदिरात शिरलेले युवक जिहादी विचारांचे होते. मंदिर बंद असताना त्यांनी आतमध्ये येण्याचा हट्ट धरला होता. तुम्हाला जर धुपचं दाखवायची आहे, तर जसे सगळे आत येतात त्याप्रमाणेच या. हिंदू धर्म प्रथा परंपरेनुसार दर्शन घ्या आणि निघून जा.”

“मंदिरामध्ये दहा-पंधरा तरुण टोप्या घालून शिरले होते. त्याचबरोबर त्यांच्या हातात हिरवे झेंडे होते. जिहादी विचारांचे तरुण मंदिरात आले होते,” असं देखील ते (Nitesh Rane) यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3otI1Y7

You might also like