Nitesh Rane | “दंगलींच्या मागचा मास्टर माईंड सिल्व्हर ओकमध्ये…” ; नितेश राणे यांचा घणाघात
Nitesh Rane | सिंधुदुर्ग: भाजप नेते नितेश राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. राज्यामध्ये होत असलेल्या दंगलींबाबत नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या दंगली होत आहे त्याचा मास्टर माईंड सिल्व्हर ओकमध्ये आलेला, अशा शब्दात नितेश राणे यांनी घणाघात केला आहे.
विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दंगली प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. या दंगली मागे मास्टर माईंड कोण? हे शोधून काढलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांच्या या वक्तव्याला उत्तर देत नितेश राणे म्हणाले, “दादांना मी सांगतो की या दंगली होतंय त्याचा मास्टर माईंड तुमच्या सिल्व्हर ओकमध्ये काही दिवसांपूर्वी आला होता. पवार साहेबांच्या बाजूला तो सोफ्यावर बसला होता. कलानगर हा त्याचा पत्ता आहे.”
नितेश राणे यांनी दंगलीचा मास्टरमाईंड उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असल्याचा म्हटलं आहे. कारण उद्धव ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान वांद्रे येथील कलानगरमध्ये आहे. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची बैठक झाली होती. शरद पवारांच्या निवासस्थानी म्हणजेच सिल्व्हर ओकवर ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे शरद पवारांच्या शेजारी सोप्यावर बसले होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, “दंगली घडवून स्वतः मुख्यमंत्री बनण्याची सुप्त इच्छा उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात आली आहे. मुख्यमंत्री होण्याची इच्छा आणि स्वप्न आजही मेलेलं नाही. उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा हे मी सतत सांगत आहे. 1993 चे दंगलीनंतर 1995 ला राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आली होती, असं म्हणणाऱ्या ठाकरेंनी 2004 ला परत तोच प्रयत्न केला होता.”
महत्वाच्या बातम्या
- IPL 2023 | प्लेऑफ पूर्वी CSK ला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू सीजनमधून बाहेर
- CRPF Recruitment | सीआरपीएफ यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू
- Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकच शहाणा माणूस बाकी सर्व मूर्ख…”; संजय राऊतांचा टोला नेमका कुणाला?
- Sanjay Raut | दिल्ली दरबारात महाराष्ट्राचा पायपुसणं झालंय; संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका
- UPSC Recruitment | यूपीएससी यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Comments are closed.