Nitesh Rane | दिशा सालियन प्रकरणी सीबीआयच्या अहवालांनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले,

Nitesh Rane |  मुंबई : सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) च्या मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death case) मोठा खुलासा झाला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची एकेकाळची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते.

दिशाचा सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप नारायण राणेंनी केला होता. मात्र, आता सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर केलाय. यात त्यांनी दिशाचा मृत्यू दारूच्या नशेत तोल गेल्यानं आणि १४ व्या मजल्यावरून पडून झाल्याचं म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यूच्या पाच दिवस आधी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे सुशात सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाशी जोडलं जात होतं. दरम्यान याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.

“मी सीबीआयने नोंदवलेल्या निरीक्षणासाठी त्यांना दोष देणार नाही. ७२ दिवसांनी सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला होता. ८ जूनपासून महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने इतक्या चांगल्या पद्धतीने सर्व पुरावे मिटवण्यात आले की, सीबीआयकडे तपास आला तेव्हा काहीच सापडलं नाही,” असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. Master of all Cover ups! असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.