Nitesh Rane | दिशा सालियान प्रकरणावरून नितेश राणेंकडून चौकशीची मागणी, सभागृहात मोठा गोंधळ!

Nitesh Rane | नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर होणाऱ्या या अधिवेशनात अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. त्याचवेळी पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये वादावादी झाली. दरम्यान शिंदे गट आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक धक्कादायक आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात येत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी आज दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली. यानंतर आमदार नितेश राणे यांनी देखील आक्रमक होत चौकशीची मागणी केली.

नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले. यामुळे दोन वेळा सभागृह तहकूब करण्यात आले. कोणाच्या राजकीय दबावामुळे दिशी सालियन प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला. तिच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले. ८ जूनच्या पार्टीत कोण कोण होतं, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

यानंतर पुन्हा एकदा सभागृह सुरु करण्यात आले. तेव्हा सत्ताधाऱ्यांनी पुन्हा हा मुद्दा उचलुन धरला. त्यामुळे १५ मिनिटासाठी सभागृह तहकूब करण्यात आले.

आज नागपूर विधानसभेत पत्रकारांशी बोलताना नितेश राणे यांनी हे प्रकरण पुन्हा उघडण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत आगामी काळात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात. दिशा सालियान आणि सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हायला हवी, असं ते म्हणाले. दिशा सालियान मृत्यू प्रकरण अद्याप मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे, सीबीआय या प्रकरणाचा तपास करत नाही.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा उघड करून त्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. 8 आणि 9 जूनच्या मध्यरात्री घडलेल्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असे राणे म्हणाले. दिशा सालियन या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी दोनदा का बदलले? याचाही खुलासा व्हायला हवा. आजपर्यंत, दिशा सालियनचा अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आलेला नाही. या सर्व गोष्टी का लपवल्या जात आहेत?, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.