Nitesh Rane | नाना पटोले यांना काँग्रेसचा अपमान मान्य आहे का? नितेश राणेंचा नाना पटोले यांना खडा सवाल

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर विरोधकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. कर्नाटकचा विजय काँग्रेसचा नसून विरोधकांचा आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्यावरून नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर राणेंनी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांना प्रश्न विचारला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले, “मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, संजय राऊत महाविकास आघाडीमधील शकुनी मामा आहे. महाविकास आघाडीमध्ये भांडण आणि काड्या लावायचं काम राऊत करतात. देशभरात काँग्रेसच्या विजयाबद्दल बोलले जात आहे. मात्र, संजय राऊत नाना पटोले यांच्यासमोर म्हणतात कर्नाटकमधील विजय काँग्रेसचा नसून विरोधकांचा आहे. काँग्रेसचा हा अपमान नाना पटोले यांना मान्य आहे का?”, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. पटोलेंनी यांचं उत्तर द्यावं, असं देखील ते म्हणाले.

“कर्नाटकमध्ये हिरवे झेंडे लावून काँग्रेस कुणाला खुश करत आहे? काँग्रेसला की पाकिस्तानला”, असा सवाल देखील नितेश राणे यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचा रुबाब होता. मात्र, उद्धव ठाकरे यांची अवस्था खूप वाईट आहे. युती सरकारमध्ये ठाकरे यांना सन्मान मिळायचा. पण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातील सरदाराप्रमाणे झाली आहे. महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणण्याचा प्लॅन उद्धव ठाकरे यांचा होता, याबाबत पोलिसांनी तपास करायला हवा.”

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.