Nitesh Rane | नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात! म्हणाले, मर्दानगीवर कलंक…

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: काल (10 जुलै) नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक टीका केली. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना ‘नागपूरचा कलंक’, असं म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे.

Stigma on masculinity

उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ट्विट करत नितेश राणे म्हणाले, “मर्दानगी वर कलंक ! हिजड्यांच्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा..बायला कुठला!!” उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आधीच भाजप आणि ठाकरे गट यांच्यात वाद पेटला होता. त्यात नितेश राणे यांच्या या ट्विटनंतर हा वाद आणखी वाढायची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका (Nitesh Rane) केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “सध्या देवेंद्र फडणवीस यांची स्थिती खूप विचित्र झाली आहे की त्यांना ती सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.” राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणे शक्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांची ही ऑडिओ क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंनी त्यांचा ‘नागपूरला लागलेला कलंक’ असा उल्लेख केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते (Nitesh Rane) उद्धव ठाकरेंवर सडकावून टीका करताना दिसले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ‘कलंकीचा कावीळ’ असं म्हणत ट्विट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/46HJfQP