Nitesh Rane | “पाकिस्तानच्या प्रेमात असलेले संजय राऊत…”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: भाजपचे आमदार नितेश राणे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानच्या प्रेमात असलेल्या संजय राऊत आणि टोळीला आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला मान हजम होत नाही, अशा खोचक शब्दात नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “काल आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फार मोठा सन्मान झाला. एका देशाच्या पंतप्रधानांनी तो केला. मान मागितला नाही तर मिळवला जातो, याचे उत्तम उदाहरण काल दिसून आले. पण पाकिस्तानच्या प्रेमात असलेल्या संजय राऊत आणि त्यांच्या टोळीला आमच्या देशाच्या पंतप्रधानांना मान मिळतोय हे कधीच पटणार नाही, कधीच हजम होणार नाही.”

संजय राऊत नक्की काय म्हणाले? (What exactly did Sanjay Raut say?)

“पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी मोदींचे चरणस्पर्श केले याचा आनंद आहे. मात्र, तो देश अंधश्रद्धा आणि जादूटोणा यासाठी प्रसिद्ध आहे. अशा देशाच्या पंतप्रधानांनी मोदींचे चरणस्पर्श केले म्हणून भाजपचे लोक डंका वाजवतं असतील, तर त्यांना माझा सलाम आहे,” असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहे. त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन झाल्यानंतर पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी मोदींचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3IxF67H

You might also like

Comments are closed.