Nitesh Rane | “राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेत चालण्यासाठी पैसे देऊन कलाकार आणलेत”; नितेश राणेंचे गंभीर आरोप 

Nitesh Rane | मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रातील प्रवास संपला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी प्रचारासाठी गेले आहेत. त्यामुळे दोन दिवस यात्रा स्थगित केली आहे. त्यानंतर ही यात्रा मध्यप्रदेशमधून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राहुल गांधींवर आरोप केले आहेत.

‘भारत जोडो यात्रे’त अनेक कलाकरांनी हजेरी लावली. मात्र, या कलाकारांना यात्रेत सहभागी होण्यासाठी पैसे देऊन आणले जात असल्याचा गंभीर आरोप नितेश राणेंनी केला आहे. ट्विट करत नितेश राणेंनी राहुल गांधीवर टीका केली आहे. या ट्विटमध्ये व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केला आहे.

“भारत जोडो यात्रेत राहुल गांधींबरोबर चालण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले जातात, याचा हा पुरावा. सब गोलमाल है भाई… हा पप्पू कधी पास नाही होणार,” असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

 

मध्यप्रदेशमध्ये कुठला कलाकार राहुल गांधींबरोबर चालू शकतो, यासाठी काही पैसे देण्यात येतील. यासाठीचा मॅसेज ‘भारत जोडो यात्रे’च्या टीमकडून पाठण्यात आला आहे, असं या फोटोमध्ये दिसत आहे. नितेश राणेंच्या या दाव्याला काँग्रेसकडून काय उत्तर येतंय का? हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.