Nitesh Rane | “व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मार्टरमाईंड कलानगरमध्ये बसलाय”- नितेश राणे
Nitesh Rane | मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओचे पडसाद आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पहायला मिळाले. राजकीय वर्तुळातूनही याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या व्हिडीओवरून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.
“व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मार्टरमाईंड कलानगरमध्ये बसलाय”
“शीतल म्हात्रेंचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. यासंदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली असून त्या तक्रारीनुसार हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे मानस कुवर आणि अशोक मिश्रा ही दोन व्यक्ती असल्याचं पुढं आलं आहे. हे दोघेही ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. तसेच हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मास्टरमांईंड कलानगरमध्ये बसला आहे”, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
“मॉर्फ व्हिडीओ तुम्हालाच करता येतो?”
“हे जर युवासेनेचे पदाधिकारी असतील तर युवासेनेच्या प्रमुखांनी यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावं. जे ठाकरे गटाबरोबर राहतील, ते चांगले. जे त्यांना सोडून गेले, त्यांची बदनामी करण्याचा प्रकार फार पूर्वीपासून सुरू आहे. मॉर्फ व्हिडीओ तुम्हालाच करता येतो, असं नाही”, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
Nitesh Rane Criticize Yuvasena regarding Sheetal Mhatre’s viral video
“तुम्ही जर हा खेळ सुरू करत असाल, तर याचा शेवट आम्हाला करता येतो. आम्हीही रात्री 7.30 नंतरचे काही व्हिडीओ बाहेर काढू. 8 जून रोजीचे काही व्हिडीओ आमच्याकडे सुद्धा आहेत”, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.
- Ajit Pawar | “40 आमदारांना सांभाळायला निधीची उधळण, म्हणून भाजपचे 105 आमदार नाराज”- अजित पवार
- Ajit Pawar | “जिकडे मुख्यमंत्री तिकडे शंभूराज, बॉडीगार्डसारखी पाठच सोडत नाहीत”; अजित पवारांचा खोचक टोला
- Ashish Shelar | रस्त्यांच्या कामावरुन विधानसभेत आदित्य ठाकरे-आशिष शेलार यांच्यात खडाजंगीa
- Sanjay Raut | “तुमची पापं लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू नका”; ‘त्या’ व्हिडीओवर राऊतांची प्रतिक्रिया
- Ajit Pawar | “त्यामागे कोण मास्टरमाईंड हे..”; शीतल म्हात्रे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी अजित पवारांचं वक्तव्य
Comments are closed.