Nitesh Rane | “संजय राऊतांचा लव्ह जिहाद…”; नितेश राणेंचं राऊतांवर टीकास्त्र

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जहरी टीका केली आहे. संजय राऊत यांचा लव्ह जिहाद झाला आहे, असं म्हणतं राणेंनी राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.

संजय राऊतांवर टीका करत नितेश राणे म्हणाले, “संजय राऊत जर खरंच राजाराम राऊत यांचा मुलगा असेल तर त्यांनी त्र्यंबकेश्वरला येऊन दाखवावं. संजय राऊतांचा लव्ह जिहाद झाला आहे. त्यांचे शुद्धीकरण करणे अजून बाकी आहे. त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर संजय राऊत दोन पायांनी परत येणार नाही.”

पुढे बोलताना राणे म्हणाले, “संजय राऊत मुस्लिम लीगचे प्रवक्ते आणि आधुनिक जिन्ना जिहादी विचारांच्या मुस्लिमांना पाठिंबा देत आहे. संजय राऊत आजकाल मुस्लिम समाजाच्या प्रेमात पडले आहे.” आम्हाला चादर घालायची असा हट्ट धरून त्या लोकांनी मंदिरात प्रवेश केला होता, हे कदाचित मुस्लिम लीगच्या प्रवक्त्याला (संजय राऊत) समजलं नसेल, अशा शब्दात नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.

नक्की काय म्हणाले संजय राऊत? (What exactly did Sanjay Raut say?)

त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “उरूसमध्ये धूप दाखवण्याची परंपरा 100 वर्ष जुनी आहे. मंदिराच्या गेटवर ते आपल्या देवांना धूप दाखवून पुढे त्यांच्या मार्गाने जातात. ही त्यांची खूप जुनी परंपरा आहे.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3o5cM5D

You might also like