Nitesh Rane | संजय राऊतांना अजून अक्कलदाड आली नाही; नितेश राणेंचं संजय राऊतांवर टीकास्त्र

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यात राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. या निर्णयानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं होतं. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत नितेश राणेंनी राऊतांवर घणाघात केला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे. नितेश राणे म्हणाले, “संजय राऊत जगातला सर्वात मूर्ख आणि चू*** माणूस आहे. संजय राऊतांना अजून अक्कलदाड आलेली नाही. राऊतांनी नंगानाचाबद्दल बोलू नये. मुंबईच्या अरे गेस्ट हाऊसमध्ये काय झालं होतं? हे त्यांनी सांगावं.”

“दुसऱ्यांचे कपडे काढण्या अगोदर स्वतः कुठे-कुठे कपडे काढतात याबद्दल राऊतांनी बोलावं”, असं म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत संजय राऊत म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकार तीन महिन्यात कोसळणार आहे. कारण हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आधी 16 आमदारांना घरी जावं लागणार आहे. त्यानंतर 24 आमदारही घरीच बसणार आहे. या सरकारचा अंत जवळ आला आहे. बेकायदा सरकारचा मृत्यू अटळ आहे.”

महत्वाच्या बातम्या

You might also like