Nitesh Rane | संजय राऊतांनी बरबाद केलेल्या त्या डॉक्टर महिलेला आधी न्याय द्या; नितेश राणेंची शरद पवारांना विनंती
Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (29 जुन) पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महिला सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. जानेवारी 2023 ते मे 2023 या कालावधीमध्ये राज्यातून हजारो महिला गायब झाल्या असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मुद्द्यावरून नितेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
The life of a woman doctor in Mumbai has been ruined by Sanjay Raut – Nitesh Rane
नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “शरद पवार यांनी राज्यातील गायब झालेल्या मुलींची आकडेवारी दिली. मुंबईतील एका डॉक्टर महिलेचं आयुष्य संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांच्यामुळे बरबाद झालं आहे. संजय राजाराम राऊत यांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना तिचं जगणं मुश्किल केलं होतं. त्या महिलेला शरद पवारांनी न्याय मिळवून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो.”
पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “संजय राऊत हे महिला अत्याचारांबाबत बोलत आहे. त्याचबरोबर महिला अत्याचारावरून संजय राऊत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत आहे. हा सर्वात मोठा जोक आहे. म्हणजे उद्या शक्ती कपूरनं महिला सुरक्षेबाबत कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर देण्यासारखा हा विषय आहे. आधी त्या डॉक्टर महिलेला न्याय द्या आणि मग राज्यातील अन्य महिलांबद्दल बोला, एवढंच मी संजय राजाराम राऊत यांना सांगेल.”
— nitesh rane (@NiteshNRane) June 30, 2023
दरम्यान, शरद पवार यांनी राज्यातील महिला सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर वक्तव्य करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष घ्यावं, असं शरद पवार म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हे ट्विट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update । पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती
- Nilesh Rane | “उद्धव ठाकरे साहेब याच्यातून काहीतरी शिका…”; शरद पवारांच्या वक्तव्यावरून निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
- Eknath Shinde | आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला ‘चोर मचाये शोर’ म्हणतं भाजप-शिंदे गटाचं प्रत्युत्तर
- Amol Mitkari | देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाले – अमोल मिटकरी
- Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता! ठाकरेंचा खास शिलेदार जाणार शिंदे गटात?
Original NEWS SOURCE – https://bit.ly/437mbIe
Comments are closed.