Nitesh Rane | संजय राऊत मुस्लिम समाजाच्या प्रेमात; नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. या सर्व घटनाानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात भाजप नेते नितेश राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांवर घणाघात केला आहे. संजय राऊत मुस्लिम समाजाच्या प्रेमात पडले आहे, अशा शब्दात नितेश राणेंनी राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले, “संजय राऊत मुस्लिम समाजाच्या प्रेमात पडले आहे. त्याचबरोबर राऊत राज्यात अस्थिरता निर्माण करायचं काम करतात. संजय राऊत सतत घटनात्मक संस्थांवर टीका करत असतात. संविधानात्मक सगळ्या पदांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न राऊत करतात. संजय राऊत यांचे गुण एखाद्या शहरी नक्षलवाद्यासारखे आहे.”

या पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. बोलताना राणे म्हणाले, “राज्यातील दंगली घडवण्यामागे उद्धव ठाकरे यांचा हात आहे. दंगली घडवणारे मास्टरमाईंड कलानगरमध्ये बसले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची चौकशी झाली पाहिजे”, असा गंभीर आरोप नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने शिंदे फडणवीस सरकारवर सामना अग्रलेखाच्या माध्यमातून पुन्हा एकदा टीकास्त्र चालवलं आहे. “भाजपने शिवसेना फोडून राज्य केले आहे. तर त्यांना आता समाज फोडून निवडणुका लढायच्या आहे. भारतीय संविधान, धार्मिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता हे सगळं विसरून सत्ता गाजवणारे सभोवती वावरत आहे”, असं देखील सामना अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या