Nitesh Rane | “संजय राऊत मोठा लँड माफिया…” ; नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात
Nitesh Rane | मुंबई: भाजप नेते नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यावर माफिया म्हणतं आरोप केला होता. राऊतांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देत नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सर्वात मोठा लँड माफिया म्हटलं आहे.
“संजय राऊत किती मोठा लँड माफिया आहे हे मी सर्वांना सांगत आहे. अलिबागला संजय राऊत यांना जागा हवी होती. त्यांनी ही जागा मराठी कुटुंबाकडून कवडीमोल भावात दमदाटी करून घेतली. मुंबईतले विक्रोळी, भांडुप या भागांमध्ये आर नावाच्या बिल्डरसोबत राऊतांची पार्टनरशिप आहे. त्यांच्यामार्फत ते जमिनी बळकवायचे काम करतात. दुसऱ्यांना माफिया म्हणणारा राऊत स्वतः एक मोठा लँड माफिया आहे”, असं म्हणतं नितेश राणेंनी (Nitesh Rane) संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.
पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “संजय राऊत सगळीकडे बोलत असतात की चुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कैदीनंबर 8959 (संजय राऊत) ची इच्छा आहे की मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचे कपडे फाडावे. कारण संजय राऊत आरोप करत असेल तर मी उत्तर देत राहणार.”
संजय राऊत सामना अग्रलेखाच्या माध्यमातून महाविकास आघाडीत फूट पाडत आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून राऊत राज्यामध्ये अशांती पसरवण्याचे काम करत आहे, या शब्दात नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राऊतांवर घणाघात केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court | ‘या’ दिवशी लागू शकतो सत्तासंघर्षाचा निकाल
- Ramraje Naik Nimbalkar | अधिकाऱ्याची दारू उतरलेली नसते तिथे दादा विकासाच्या कामाला हजर : रामराजे नाईक निंबाळकर
- Sanjay Raut | जेव्हा तुमच्यासोबत कोणी नव्हतं, तेव्हा ‘सामना’ तुमच्या सोबत होता; संजय राऊत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
- Devendra Fadnavis | “आव्हाडांवर कारवाई केली जाईल…” ; जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा
- Sanjay Raut | कर्नाटक मतदानाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप ; म्हणाले…
Comments are closed.