Nitesh Rane | संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील- नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे आमदार नितेश राणे नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात नितेश राणे यांनी राऊतांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत महाविकास आघाडीतील गौतमी पाटील (Gautami Patil) आहे, असा खोचक टोला राणेंनी राऊतांना लगावला आहे.

Nitesh Rane said Sanjay Raut is Gautami Patil of Mahavikas Aghadi

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “संजय राऊत नेमके कुणाच्या बाजूने उभे आहेत, हे त्यांनाही माहित नाही. ते एवढ्या वेळा रंग बदलला की, सरड्यालाही त्यांच्यासमोर लाज वाटेल. महाविकास आघाडीतील गौतमी पाटील म्हणजेच संजय राजाराम राऊत आहे.”

पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “गौतमी पाटील कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करते. ती नाचते आणि लोकांनाही नाचवते. ती एक उत्तम कलाकार आहे आणि लोकप्रियही असेल. तिला बघायला लोकांना आवडतं. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला वाटतं की, लोकांना त्याला पाहायला आवडतं. संजय राऊत यांचा हा गैरसमज दूर केला पाहिजे.”

“माझी गौतमी पाटीलला विनंती आहे की तिनं तिच्या मेकअपचे सामान संजय राऊतांकडं पाठवावं. मेकअप करून राऊतांनी थोबाड थोडं चांगलं करावं. कारण दररोज सकाळी ते नशेत असल्यासारखे बोलत असतात. ते लोकांची सकाळ खराब करून टाकतात”, असही ते (Nitesh Rane) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43rpMkT