Nitesh Rane | संजय राऊत राष्ट्रवादीची YZ टीम आहे – नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर निशाणा साधला होता. चंद्रशेखर बावनकुळे भाजपची सी टीम असल्याचं  संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

The corrupt Sanjay Raut was spreading knowledge to the BJP – Nitesh Rane

संजय राऊत यांच्या वक्तव्याला उत्तर देत नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “लोकांचा पैसा खाणारा, मराठी माणसांना बेघर करणारा, भ्रष्टाचारी, 420 संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन भाजपला ज्ञान पाजळत होता. भ्रष्टाचार करून लोकांचे पैसे खाऊन संजय राऊत आमच्या चंद्रशेखर बावनकुळेवर टीका करत आहे. आमचे बावनकुळे साहेब केसीआरची सी टीम आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर मग मी म्हणतो संजय राजाराम राऊत राष्ट्रवादीची YZ टीम आहे.”

पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे मुखपत्र सामना. हो, मी सामनाला राष्ट्रवादीचं मुखपत्र म्हटलं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सामनामध्ये फक्त राष्ट्रवादीची भूमिका आणि राष्ट्रवादीचं हित मांडलं जातं आहे.”

“पगार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून घ्यायचा आणि पाय चाटण्याचं काम सिल्वरओकचं करायचं. सामना नेमकं राष्ट्रवादीचं मुखपत्र आहे की शिल्लक सेनेचं मुखपत्र? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळायला हवं. काल पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या नावात तुझ्या मालकाचं नाव नव्हतं. तुमच्या दोघांचा कचरा झाला आहे. त्याबद्दल संजय राऊत यांनी विचार करायला पाहिजे आणि मालकाच्या कुशीत जाऊन बसायला हवं”, असही ते (Nitesh Rane) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PAjxHN

You might also like

Comments are closed.