Nitesh Rane | “सर्व काही खोक्यांसाठी चालू आहे” ; नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Nitesh Rane | रत्नागिरी: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज कोकण दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यावर ठाकरे रिफायनरीला विरोध करत लोकांशी संवाद साधत आहे. कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडली आहे. अशात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणेंनी ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल करत नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “उद्धव ठाकरे मोठे दलाल आहेत. हे सर्व काही खोक्यांसाठी चालू आहे. ठाकरे यांना त्यांच्या मुलाचं लग्न करायचं आहे, त्यासाठी त्यांना पैसा जमा करायचा आहे. मुख्यमंत्री असताना त्यांना रिफायनरी प्रकल्प हवा होता म्हणून त्यांनी पत्र काढलं होतं आणि आता ते या प्रकल्पाला विरोध करत आहे. हा विचार कसा बदलला? हा विचार कोकणाच्या विकासासाठी नाही तर मातोश्रीवर पैसे आला पाहिजे, म्हणून बदलला आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही या प्रकल्पासाठी खूप सकारात्मक विचार करत आहे. कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जात आहे. ज्यांना कोकणाचं नशीब अंधारात ठेवायचं आहे, ते या प्रकल्पाला विरोध करत आहे.”

दरम्यान, उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहे. ते बारसू, सोलगाव, साखरकुंबे या गावांना भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या भावना जाणून घेणार आहे. त्यानंतर ठाकरेंची महाड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये ते रिफायनरी प्रकल्पासंबंधात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.