Nitesh Rane | “हीच ती वेळ.. उरलेले दुकान बंद करायची..”; नितेश राणेंचा टोला नेमका कुणाला?

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही हालचाली सुरू असतात. विरोधी आणि सत्ताधारक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशा नितेश राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नितेश राणेंनी खोचक टीका केली आहे. हीच ती वेळ दुकान बंद करायची, असा घणाघात नितेश राणेंनी केला आहे.

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ठाकरे गटाचे नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) व अन्य नेत्यांचे संभाषण आहे. सर्व नाना पटोले (Nana Patole) यांची फिरकी घेताना दिसत आहे. यावरून नितेश राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची खिल्ली उडवली आहे.

Who did Nitesh Rane criticize?

ट्विट करत नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “काल हा video mute करुन दाखवा असे channels ना सांगितले गेले..
उध्दव ठाकरेंचे शिल्लक आमदार नाना पटोलेंची फिरकी घेत आहेत.. किती serious आहेत case बद्दल.. किती ती निष्ठा उध्दवजींवर !!! हिच ती वेळ..उरलेल दुकान बंद करण्याची !!😂😂”

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला वाचवायचे असेल तर नाना पटोले यांना हटवा, अशी मागणी काही काँग्रेस नेत्यांनी केल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45tQF9J