Nitesh Rane । “उद्धव ठाकरेंना मशाल नाही, आईस्क्रीमचा कोन दिलाय”; नितेश राणे यांचा हल्लाबोल
मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगानं दिलेल्या निवडणूक चिन्हावरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंना मिळालेली निशाणी मशाल नव्हे तर आईस्क्रीमचा कोन आहे, अशा शब्दांत राणेंनी घणाघाती टीका केली आहे.
अंधेरी पूर्व निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळेच आज अर्ज सादर करण्याच्या निमित्ताने दोन्ही बाजूने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. अनेक मोठे नेते आज अंधेरीमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. यावेळी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य करताना त्यांच्या नव्या निवडणूक चिन्हावरुन म्हणजेच ‘मशाली’ संदर्भात भाष्य केलं आहे.
प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरेंच्या गटाला देण्यात आलेल्या नव्या चिन्हासंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी ही मशाल नसून आईस्क्रीमचा कोन असल्याचा टोला ठाकरे गटाला लगावला. तसेच हे चिन्ह उद्धव ठाकरेंना का देण्यात आलं यासंदर्भातील कारणही त्यांनी सांगितलं. “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या माणसाचं चिन्ह हे मशाल नाही कारण त्याच्यातली आग कधीच विझली आहे. खरं तर आईस्क्रीमचा कोन मिळाला आहे जो थंड पडलेला आहे,” असं नितेश राणे म्हणाले. “मशाल नाहीच आहे की आइस्क्रीमचा कोन आहे. उद्धव ठाकरेचं मशाल हे चिन्ह होऊच शकत नाही. त्या माणसामधली आग संपलेली आहे,” असंही नितेश राणेंनी म्हटलं.
यावेळी बोलताना राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “ना स्वत:चा पक्ष वाचवता आला नाही, चिन्ह वाचवता आलं नाही. वडिलांच्या आजारावेळी आदित्य ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते. एकदा प्रवासादरम्यान स्वत: रमेश लटके यांनी मला त्यांना किती मानसिक त्रास सुरू आहे हे सांगितलं. त्यांचे फोन मातोश्रीवर उचलण्यात येत नव्हते. या सर्व गोष्टी बाहेर निघाल्यानंतर सहानुभूती कोणाला मिळते ते पाहू. ” असा खुलासा राणेंनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Sushama Andhare । “मी माझं बाळ शिवसेनेला दत्तक दिलंय..” ; सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका?
- Sudhir Mungantiwar – नरेंद्र मोदी यांची उंची एव्हरेस्ट पेक्षा मोठी आहे – सुधीर मुनगंटीवार
- Nitesh Rane | “जास्त म्याव म्याव केलं तर…”, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना गंभीर इशारा
- Katrina Kaif | सिंदूर, बांगड्या आणि लाल साडी नेसून कॅटरिना कैफने घातला पती विकी कौशलसाठी पहिल्या ‘करवा चौथ’चा घाट
- Explained | शेलार म्हणतात हे ‘उपरे’, ठाकरे म्हणतात ही ‘हिटलरशाही’ ; एका पोटनिवडणुकीसाठी एवढा तमाशा!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.