Nitesh Rane । संजय राऊतांचं सगळं राजकारण सौदेबाजी आणि चाटूगिरीवर चालत; नितेश राणेंचं राऊतांवर टीकास्त्र
Nitesh Rane | मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) सध्या बेळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांनी मराठी भाषिकांच्या मुद्द्यावरून शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेला उत्तर देत भाजप आणि मी कायमच बेळगावमधील मराठी भाषिकांच्या पाठीशी उभे आहोत असं म्हटल. तर आता भाजपचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane) यांनी देखील संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले नितेश राणे (What Did Nitesh Rane Say)
नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. राणे म्हणाले की, संजय राऊत आता बेळगावला गेले आहेत ते नक्की कशासाठी गेले? संजय राऊतांचं सगळं राजकारण सौदेबाजी आणि चाटूगिरीवर चालत. राऊतांनी बेळगावमध्ये येऊ नये म्हणून तिथले लोक ऑफर देतात. असाच एक प्रकार त्याठिकाणी घडलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचं याचं काही घेणं देणं नाही. पण तिथल्या उमेदवारांवर दबाव टाकण्यासाठी सौदेबाजी करून राऊत गेले असल्याचं राणेंनी म्हटलं आहे. तसचं राऊतासह उद्धव ठाकरेंवर देखील हल्लाबोल केला, जसा हा नोकर आहे तसाच त्याचा मालक आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी काय केलं. संजय राऊत इतका पैसा आणतोय कुठून? सध्या संपादक आहेत मग काय काम करतात? हे सगळं येत कुठून तर आता जो फोन बेळगावातून सौदेबाजीचा त्या उमेदवाराला आला असे धंदे करून पैसा मिळतात, असा आरोप करत राणेंनी राऊतांना चिमटीत पकडलं आहे.
संजय राऊत ठाकरे- पवारांच्या घरात आग लावतोय : नितेश राणे ( Nitesh Rane Targeted On Sanjay Raut)
दरम्यान, नितेश राणे यांनी पुढे म्हटलं की, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये आग लावण्याचं काम संजय राऊत करत आहेत. तर “राऊतांचा एक डोळा पवारांवर तर एक डोळा आदित्य आणि तेजस ठाकरेंवर आहे. यामुळे माझी पवार साहेबांना विनंती आहे की, संजय राऊत यांना घरात घेऊ नका. अशा शब्दात नितेश राणेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Abdul Sattar | राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादांवर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Sharad Pawar Resigns | 11 मे नंतर स्थापन होणार नवीन सरकार; ‘त्या’ ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण
- Devendra Fadanvis | “संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडावी” : देवेंद्र फडणवीस
- National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Shalinitai Patil | शालिनीताई पाटील यांचं अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य ; म्हणाल्या …
Comments are closed.