“सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर…,” नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात काही दिवसांपुर्वी एक इमारत कोसळली होती. यात एकाचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बेकायदेशीर बांधकाम कोसळल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे.

विरोधकांना नोटीसा पाठवताना जी तत्परता दाखवली जात आहे, तिच तत्परता हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दाखवणार आहात काय? असा सवाल नितेश राणे यांनी पत्रातून केला आहे. तसेच अनाधिकृत बांधकामं वाढत वाढत खारफुटी जागांवर पोहचली आहेत. त्यामुळं जीवाशी खेळ करत तिथं दोन दोन मजली झोपडपट्ट्या उभारल्या आहेत असा आरोप राणे यांनी शिवसेनेवर केला आहे.

तसेच पुढे सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीने राज्य चालते. सध्याची मुंबईची अवस्था पाहता कुणीही अस्वस्थ होऊ शकतो अशी झाली आहे. गुन्हेगारीचं साम्राज्या, भ्रष्टाचाराची दलदल वाढत सामान्य नागरिकांच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचली आहे. तुम्हीदेखील मुंबईचे रहिवासी असल्याने ढिसाळ कारभाराची राड तुमचा उंबरा एक ना एक दिवस उलांडणारच होती असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा