स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषण द्यायची, राऊतांच्या अग्रलेखाला नितेश राणेंचं प्रत्युत्तर

मुंबई : भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हतं. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली .यावर भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे . ‘शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!, असे कॅप्शन लिहिती शिवसेनेमधल्या आयरामांची यादी नितेश राणे यांनी प्रसिद्ध केली आहे. नितेश राणे यांनी ट्विटमधून संजय राऊतांना उत्तर दिलं आहे. शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे..

पण थोडी माहितीसाठी, असं म्हणत त्यांनी शिवसेनेतील आयारामांची काही नावे सांगितली आहेत. सचिन आहिर – bks ची जबाबदारी… राहुल कनाल – शिर्डी संस्था… आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था… उदय सामंत – कॅबिनेट मंत्री… अब्दुल सत्तार – मंत्री…. प्रियांका चतुर्वेदी – खासदार.. डाके..रावते..रामदास कदम..शिवतारे..राजन साळवी, सुनील शिंदेंसारखे जुने सैनिक दिसणार नाहीत.. स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषण द्यायची, अशा शब्दात नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.

शिवसेना मराठी माणसाची संघटना म्हणे.. मग.. BEST च्या जागा – कनाकीय… Bmc कॉन्ट्रॅक्ट – दिनो…. रात्रीच्या पार्ट्या – पटानी..कपुर..जॅकलिन.. इथे कुठे शाखा प्रमुख दिसत नाहीत? मराठी माणूस दिसत नाही?, असं म्हणत राणेंनी नेहमीच्या आक्षेपाच्या मुद्द्यावरुन सेनेवर टीका केलीय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा