Nitin Gadkari | “कारण नसताना लोक…”, प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने होणाऱ्या टीकांवर नितीन गडकरी कडाडले
Nitin Gadkari | मुंबई : महाराष्ट्रातून वेदांता फाॅक्सकाॅन आणि टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला गेला. यावरुन जनतेने तसेच विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. या सत्ताधारकांनी अनेक स्पष्टीकरण दिलं असून आता केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यातही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही सर्वात वेगाने वाढत आहे. मी नागपूरचा आहे. आमच्याकडे टालची फॅक्ट्री आहे. जे एअरबस आणि बोईंग दोघांचे सुटे भाग बनवतात. तिथे आता राफेल आणि फाल्कनही बनवत आहेत. उद्योगधंदे अनेक ठिकाणी जातात. उद्योग कुठे स्थापन करायचा कुठे नाही हा गुंतवणूकदाराचा अधिकार असतो. हे राज्याच्या हातात नसतं. गुंतवणूकदाराचा अधिकार असतो की उद्योग कुठे सुरु करायचा, असं नितीन गडकरी म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये वाहनउद्योगातील कंपन्या आहेत. मर्सिडजी इलेक्ट्रीक गाडी मी नुकतीच लॉन्च केली त्याची कंपनी पुण्यात आहे. अनेक मोठ्या वाहननिर्मिती कंपन्या पुण्यात आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रात बराच विकास झालेला असल्याचं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.
आधी विदर्भ, मराठवाडा पिछाडीवर असल्याचा वाद व्हायचा. विदर्भ, मराठवडा आणि कोकणाशी दुजाभाव होत असल्याचा आरोप केला जायचा. पण आता सर्वच भागांमध्ये विकास होताना दिसतोय, असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Kesarkar | “बाळासाहेबांची खिल्ली उडवणाऱ्या…” ; दीपक केसरकरांचा सुषमा अंधारेंवर जोरदार पलटवार
- Tulsi Vivah 2022 | आज पासून सुरू होत आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त, जाणून घ्या शुभ मुहूर्त
- MS Dhoni | … म्हणून महेंद्र सिंग धोनीने उच्च न्यायालयात घेतली धाव
- Sushma Andhare | राज ठाकरेंवर तुम्ही गुन्हे दाखल केले का? ; सुषमा अंधारेंचा सवाल
- Sushma Andhare | भाषणाला परवानगी नाकारल्यामुळे, सुषमा अंधारे घेणार थेट कोर्टात धाव
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.