Nitin Gadkari | नितीन गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी! नक्की प्रकरण काय?

Nitin Gadkari | नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला असल्याची माहिती मिळाली आहे. गडकरी यांना त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी फोन करून धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नागपूर-वर्धा रोडवरील घर आणि सावरकरनगर मधील कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी नितीन गडकरी यांच्या नागपूर कार्यालयात धमकीचा फोन आला होता. फोन करून गडकरी यांना धमकी देऊन खंडणी मागण्यात आली होती. संबंधित आरोपी कर्नाटकातील कारागृहामध्ये बंदिस्त होता. त्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणानंतर आता दिल्ली कार्यालयात धमकीचा फोन आल्याने पोलीस नियंत्रणा सावध झालेली असून गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील मोतीलाल नगर महामार्गावरील निवासस्थानी हा फोन कॉल आला होता. कार्यालयातील एका कर्मचाऱ्यानी हा फोन उचलला होता. नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी समोरील व्यक्तीने दिली.

महत्वाच्या बातम्या