Nitin Gadkari | शहरी नागरिकांची टोलमधून होणार मुक्तता; नितीन गडकरींची मोठी घोषणा

दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत बोलताना एक मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे शहरातील स्थानिक नागरिकांना टोल भरावा लागणार नाहीये. याबद्दलचे अधिकृत निर्णय लवकरच घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात नितीन गाडीकरी यांना तोल संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिले.

राज्यसभेत ‘अण्णा द्रमुक’चे नेते एम. थंबीदुराई यांनी गडकरी यांना शहरातील नागरिकांना एक्स्प्रेस वेच्या कमी वापरासाठीही टोलनाक्यावर तेवढाच टोल भरावा लागतो, असे निदर्शनास आणून दिले. त्यावर गडकरी म्हणाले कि, “सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, पण मीच ‘फादर ऑफ टोल टॅक्स’ आहे. मी भारतात पहिल्यांदा टोल पद्धत सुरु केली. महाराष्ट्रातील ठाणे भिवंडी बायपास हा त्याचा पहिला प्रकल्प होता. पण शहरी भागाच्या टोल पद्धतीसाठी मी जबाबदार नाही. यात माझा दोष नाही. कारण हा निर्णय युपीएच्या काळात घेण्यात आला होता. परंतु आता आम्ही त्यावर काही उपाय योजना करणार आहोत. ज्यामुळे शहरातील नागरिकांना टोल भरावा लागणार नाही. टोलमधून शहरी भाग वगळला जाईल.”

पुढे त्यांनी असंही नमूद केलं कि, “शहरातील नागरिकांना १० किमी प्रवास करण्यासाठीही ७५ किमीच्या दराने टोल भरावा लागत आहे. हे खरंच दुर्दैवी आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही एक नवीन पद्धत सुरू करणार आहोत, ज्यात शहरी भागातील नागरिकांचा टोल माफ केला जाईल. मी तुमच्या आणि जनतेच्या भावना समजू शकतो, माझीही तीच भावना आहे. त्यामुळे लवकरच या पद्धतीत दुरुस्ती करू”, असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.