महाराष्ट्रातील ‘हे’ दोन प्रतिष्ठीत खासदार मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ‘फिक्स’

मोदी 2 या सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यमान मंत्र्यांपैकी कोण कायम राहतील आणि कोणाला वगळले जाईल, याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर या विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांचे स्थान नव्या मंत्रिमंडळात निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेकडून दोन कॅबिनेट मंत्रिपदे मागितली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

भूपृष्ठ वाहतूक आणि जलसंपदामंत्री म्हणून गडकरी यांनी अनेक प्रकल्पांना गती दिली. त्यांच्यासह पीयूष गोयल यांचे अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून नाव घेतले जाते. मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून जावडेकर यांच्या कामगिरीची प्रशंसा झाली आहे. त्यामुळे ही नावे यंदाच्या मोदीच्या मंत्री मंडळात जवळपास पक्की आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.