‘कुठलं सरकार बनवणं किंवा कुणाला मुख्यमंत्री बनवणं हे उद्दिष्ट नाही’

आपल्या संघटनेचं उद्दिष्ट साफ आहे. कुठलं सरकार बनवणं किंवा कुणाला मुख्यमंत्री बनवणं नाही, तर या राष्ट्राचं पुनर्निर्माण आहे. संपूर्ण समाज बदलवणं आहे’ असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिवराव देवधर यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पुण्यात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थी परिषदेमधील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्याच सोबत निस्वार्थ, निस्पृहपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं महत्त्वही विशद केलं. तुमच्या यशात आनंद मानणारा कार्यकर्ता घडवायला हवा असं म्हणताना त्यांनी एक सुचक विधानही केलं. महाराष्ट्रात सत्ता नाट्य सुरुच आहे. त्यातच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलताना भाजपशिवाय सरकार बनवणं शक्य नाही असं विधान केलं आहे. त्यामुळे आज गडकरींचं हे सूचक विधान राज्यातल्या भाजप नेत्यांना संघ विचारांची परत आठवण करुन देण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वच्छ आणि जबाबदार कार्यकर्ते असणे महत्वपूर्ण आहे. जीवनमूल्ये समाजात महत्वाची आहेत. त्याचप्रमाणे छोट्या छोट्या संस्कारातून माणूस घडत असतो आणि त्यानंतर समाज चांगला बनतो. याच समाजातील हजारो कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केले आहे. त्यामुळे आज आम्ही शिखरावर काम करत आहोत. पैसे, सत्ता मिळेल. पण निस्वार्थी काम करणारा कार्यकर्ता मिळू शकणार नाही, असेही गडकरींनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.