InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

रस्त्यावर पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा दंडात 20 टक्के रक्कम मिळवा – नितीन गडकरी

पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीमधील किस्सा सांगत अवैद्य वाहतूक करणाऱ्या मोटारीवर कश्या प्रकारे नियंत्रण आणता येईल हे सांगितलं. ते सिम्बॉसिस येथे कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले दिल्लीत माझ्या कार्यल्याच्या इथे मोटार पार्क करण्याची व्यवस्था नाही त्यामुळं अनेक वाहन रस्त्यावर लागली जातात.  यावर मला एक कल्पना सुचली रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाला दंड ठोठावण्यात येईल. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांचा फोटो काढून संबंधित वाहतूक प्रशासनाला पाठविल्यास त्याला २० टक्के पैसे दिले जातील असे ते म्हणाले. यामुळे नागरिकांना पैसे मिळतील आणि रस्त्यांवर पार्किंग ही होणार नाही असा दोन्ही कडून फायदा होईल

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.