InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘ज्याला आपलं घर सांभाळता येत नाही तो देश काय सांभाळणार?’

ज्या व्यक्तीला आपलं घर सांभाळता येत नाही तो देश काय सांभाळणार असं वक्तव्य गडकरी यांनी केलं. पक्ष कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. जर त्यांना हेच जमत नसेल तर, ते देशही सांभाळू शकत नाहीत असं म्हणत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

‘मी अशा अनेकजणांना भेटलो आहे जे भाजप आणि देशासाठी त्यांचं सर्वस्व अर्पण करण्यास तयार आहेत.  अशाच व्यक्तींपैकी एकाला मी विचारलं तुम्ही काय करता, तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत? आपलं दुकान चालत नसल्यामुळे ते बंद केल्याचं सांगत कुटुंबात पत्नी आणि मुलं असल्याची माहिती त्याच्याकडून मिळाली’, असं ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply