InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

नितीन गडकरींची नागपूरात योगसाधना

- Advertisement -

नागपूर यथील जागतिक योग दिनानिमित्त महानगरपालिका व नेहरू युवा केंद्रातर्फे यशवंत स्टेडियम येथे योगासनाचा कार्यक्रम पार पडला.

- Advertisement -

आयोजित कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग व अतिलघु, लघु व मध्यम उपक्रम मंत्री नितीन गडकरी यांनी योगसाधना केली.

नागपुरातील योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे व अन्य पदाधिकाऱ्यांसह गडकरी यांनी विविध योगप्रकार केले. सकाळी ५.४५ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी योगासनांचे अनेक प्रकार सादर केले. यात लहान मुलांसह अनेक वयोवृद्ध योगाभ्यासी मोठ्या संख्येने हजर झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.