‘धीरे-धीरे कीमतें बढाना है, हद से गुजर जाना है…’, महागाईवरून नितीन राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यापासून इंधनाच्या दरात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. गेल्या सात दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत आहे. तसेच संकेत वर्तवले ही जात होते. ते अंदाज आता खरे ठरताना दिसत आहे. इंधन दरवाढीच्या किंमतीवरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर ट्वीटरवरून टीका केली होती.

तर आज पुन्हा एकदा वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाना पटोलेंनंतर आता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. त्यांनी ट्विट करत हि टीका केलीय.

ट्विटमध्ये राऊत म्हणाले आहेत की,‘अच्छा सिला दिया तूने लोगों को मतों का….’ तसेच यासोबत त्यांनी एक कार्टून शेअर केले आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तबला वाजवतांना दिसत असून ‘धीरे-धीरे कीमतें बढाना है, हद से गुजर जाना है…’, असे ते म्हणतांना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा