Nitin Satpute | चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढणार? ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका 

Nitin Satpute | मुंबई : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शनिवारी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. वकील नितीन सातपुते यांनी मुंबई संत्र न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. याबाबत २० तारखेला सुनावणी होणार आहे.

नितीन सातपुते म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. त्यामुळे आमच्या सर्व अनुसुचित जमातीतील बांधवांचा अपमान झाला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा आम्ही मोठ्या प्रमाणात सन्मान करतो. त्यांचा अपमान चंद्रकांत पाटलांनी केला होता. याबाबत घाटकोपर पोलीस स्टेशन आम्ही तक्रार दिली होती. चंद्रकांत पाटील व राम कदम यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी आमची तक्रार होती. मात्र आजपर्यंत त्यांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही. याबाबत टोलवा-टोलवी सुरु आहे.”

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देखील याबाबत तक्रार दिली मात्र त्यांनी दखल घेतली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र कायद्यासमोर सर्व समान आहेत. पोलिसांनी तक्रार दाखल न करुन घेतल्यामुळे आम्ही कोर्टात याचिका दाखल केली आहे. चंद्रकांत पाटील, राम कदम, देवेंद्र फडणवीस व पोलीस स्टेशनमधील एक अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करुन यांना पदावरुन दुर करावे. त्यांना तात्काळ अटक करावी”, अशी मागणी केल्याचे नितीन सातपुते यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.