निया शर्मा व देवोलिना भट्टाचार्जी यांच्यातील शाब्दिक वादात निया शर्माने दिला माफीनामा

मुंबई : अभिनेता पर्ल व्ही. पुरीच्या अटकेवरून ट्विटरवर अभिनेत्री निया शर्मा व देवोलिना भट्टाचार्जी यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे दिसले होते. यावर आता दोघींनी ही एकमेकींना माफी मागितली आहे.

रीया शर्माने ट्विट करत माफी मागितली आहे. ‘माझी आई, भाऊ आणि मित्र रवी यांनी मला खूप प्रेमाने समजावलं की मी चुकले होते. या तिघांच्या मताचा आदर करत, देवोलिना मी तुझी माफी मागते. माझा राग अनावर झाला होता. तू मला माफ करशील अशी आशा आहे’, असं ट्विट नियाने केलं. या माफीनाम्यानंतर देवोलिनानेही नियाला माफ केलं.

यावर रिट्विट करत ‘माझ्याकडूनही चूक झाल्यास मलाही तू माफ कर. आई, भाऊ आणि रवीला माझ्याकडून धन्यवाद सांग. सुरक्षित राहा आणि काळजी घे’, असं उत्तर देवोलिनाने दिलं. ‘जिथून सुरुवात झाली, तिथेच हे सर्व संपवतेय. पुन्हा एकदा माफी मागते’, असं म्हणत नियाने पुन्हा ट्विट केलं.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा