दिल्लीत काँग्रेसला ‘आप’ची साथ नाहीच, काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची यादी

- Advertisement -
दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची युती होणार की नाही, ही गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आज अखेर पुर्णविराम मिळाला आहे. दिल्लीतील सात मतदारसंघापैकी 6 जागांची उमेदवारांची काँग्रेसकडून अखेर आज घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्याने दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसने उत्तर पूर्व दिल्लीतून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून अजय माकन, चांदनी चौक येथून जे. पी अग्रवाल, पूर्व दिल्लीतून अरविंदर सिंग लवली, उत्तर पश्चिम दिल्लीतून राजेश लिलोथिया, पश्चिम दिल्लीत महाबल मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. आता दिल्लीत भाजपा विरुद्ध काँग्रेस विरुद्ध आप अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
Loading...
Related Posts
- Advertisement -
महत्त्वाच्या बातम्या –
Loading...
- साध्वी प्रज्ञाला खोट्या गुन्ह्यात अडकवून, देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आले – अमित शाह
- आम्ही सत्ता परिवर्तन करून भिडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर
- उपाशी पोटाचे शाप साध्वीपेक्षा प्रखर आहेत, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना इशारा
- ‘चौकीदार चोर हैं’ वक्तव्यावर राहुल गांधीने व्यक्त केली दिलगिरी