InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

जात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन

आयुष्यात हक्काचा आधार ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येतोय.  ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहारमधील नितीशकुमार सरकारनं ‘युनिव्हर्सल ओल्ड एज पेन्शन स्कीम’ सुरू केली आहे. त्या अंतर्गत जात, धर्म किंवा आर्थिक स्तर न पाहता ६० वर्षांवरील ज्येष्ठांना सरकार दरमहा पेन्शन देणार आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना आहेत. परंतु हे निवृत्तीवेतन केवळ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना, एससी/एसटींमधील वृद्धांना, विधवा आणि दिव्यांगांना दिलं जातं. बिहार सरकारने हे सगळे निकष काढून टाकलेत. सरकारकडून सध्या ज्या ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही स्वरूपाचं निवृत्तीवेतन मिळत नाही, त्या सर्वांना मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ४०० रुपये पेन्शन दिली जाणार आहे.

https://bit.ly/2RcIYig

बिहार मंत्रिमंडळाने या योजनेसाठी ३८४ कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बडोद्यात सात जणांचा गुदमरून मृत्यू

उदयनराजेंच्या निषेधार्थ फलटणबंद 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.