InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

जागावाटपाबाबत अजुन निर्णय झाला नाही – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक झाली. जागावाटपाबाबत या बैठकीत फॉर्म्युला ठरणार होता मात्र त्याबाबत अजुन निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. घटक पक्षांनी जागांची मागणी केल्याने त्यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मनसेबाबत या बैठकीत चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांनी आपल्या दिल्ली भेटीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे मनसेचा आघाडीत घेण्याबाबत काँग्रेस सकारात्मक असल्याचं बोललं जातंय. पण आजच्या महत्त्वाच्या बैठकीत निर्णय न झाल्यानं घोळ कायम असल्याचं बोललं जातंय.

विधानसभेच्या प्रत्यक्ष रणसंग्रामाला सुरुवात होण्याआधीच सत्ताधारी भाजप आणि शिवसेना हे राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण राष्ट्रवादीचे 4 विद्यमान आमदार युतीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.