निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करा; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला!

मुंबई : येत्या 5 जूनला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र आता राज ठाकरे यांचा 5 जून रोजी होणार अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाला आहे. राज ठाकरेंनी स्वत: ट्विट करत तूर्तास दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. यानंतर आज पुण्यात राज ठाकरे यांची सभा पार पडत आहे. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचा लक्ष लागलं आहे. सभेला सुरवात होताच राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले कि, आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असं ठाकरे म्हणाले.

तसेच पुढे ते म्हणाले कि, नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह आहे. मी म्हटलं निवडणुका नाहीत, उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा