“कुठपर्यंत शांत बसायचं, शेवटी काही मर्यादा असतात, राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू शकतो”

परभणी : परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरून बरेच राजकारण तापले आहे. त्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. पदनियुक्तीनंतर घडलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी पदावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नियुक्ती केली गेली. मात्र नियुक्ती होऊ नये यासाठी शिवसेना खासदाराने थेट मंत्रालयात लॉबिंग केल्याची चर्चा होती.

यानंतर आता शिवसेना खासदार संजय जाधव यांनी या नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू शकतो, असे मोठे विधान संजय जाधव यांनी केलं आहे. तसेच गोयल या जिल्हाधिकारी नको म्हणून मीच मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती, अशी कबुली जाधव यांनी घनसावंगीतील शिवसेनेच्या कार्यक्रमात दिली.

काही मर्यादा असतात, कुठपर्यंत शांत बसायचे? जेव्हा माकडीणसुद्धा स्वतः बुडायची वेळ आली तेव्हा पिल्लांना पायाखाली घालते तर लक्षात ठेवा राष्ट्रवादीला आम्ही कधीही घालवू शकतो. असं भावनिक वक्तव्य त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात केलं आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना खासदार नाराज असल्याचं म्हटलं जात होतं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा