प्रसिद्धीसाठी कितीही खर्च करा, जनता तुम्हाला आपटणार; निलेश राणेंचा अजित पवारांना सणसणीत टोला

मुंबई : कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने थकविलेले जीएसटीचे पैसे द्यावेत अशी मागणी करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांनी स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी सोशल मीडियाकडे मोर्चा वळवला आहे. युट्युब, फेसबुक, ट्विटर अशा माध्यमातून चांगली प्रतिमा तयार होण्यासाठी वर्षाला तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्याची तजवीज महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आली आहे.

याच मुद्द्यावरून भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कितीही खर्च करा, पण महाराष्ट्रातील जनता तुम्हाला आपटणार, अशी खरमरीत टीका निलेश राणे यांनी केली आहे. डॉक्टर, नर्सेस, पोलिसांचे पूर्ण पगार द्यायला राज्य सरकारकडे पैसे नाहीत पण स्वतःच्या चमकोगिरीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी ५,९८,०२,४०० कोटी रुपये काढले.

अजित पवार साहेब तुम्ही स्वतःवर कितीही खर्च केला व तुम्हाला मराठी मीडिया कितीही डोक्यावर घेऊ दे पण महाराष्ट्राची जनता तुम्हाला आपटणार, असे म्हणत निलेश राणेंनी अजितदादांवर निशाणा साधला. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणतात, अजित पवार पुणे जिल्हा बंद करून बसलेत अनेक महिन्यापासून, लोकांना भिकेला लावतायत तिकडे… १२०० कर्मचारी संबंधित विभागात असताना फक्त स्वतःसाठी कोरोना काळात प्रायव्हेट एजन्सीवर एवढा खर्च कशासाठी?? महाराष्ट्रात फक्त मंत्रीच मजा मारत आहेत आणि लोक त्रस्त आहेत हे वास्तव आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा