‘कोणीही उचलून न्यायला आमदार म्हणजे काय मंडईतील भाजी आहेत का?’

सर्वात मोठ्या पक्षाकडून आमदारांच्या फोडाफोडीचे प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार रंगशारदा हॉटेलमध्ये एकत्र आले आहेत. तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचं म्हणत लोकसभा निवडणुकीच्यावेळी दिलेला शब्द पाळण्याचं आवाहन भाजपाला केलं. या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार रंगशारदा हॉटेलसाठी रवाना झाले.

मातोश्रीवरील बैठकीनंतर निघालेल्या आमदारांनी पक्षप्रमुख घेतील, त्या निर्णयामागे ठाम असल्याचं म्हणत शिवसेना मागण्यांवरून मागे हटणार नसल्याचं सांगितलं. यावेळी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. ‘शिवसेनेचा एकही आमदार फुटू शकत नाही. ज्याला हिंमत करायची आहे, त्यानं ती करून पाहावी. कोणीही उचलून न्यायला आमदार म्हणजे काय मंडईतील भाजी आहेत का?,’ असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. शिवसेनेचा आमदार फोडूनच दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी दिलं.

 

Loading...

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.