दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही; भातखळकरांचा पवारांना टोला

पुणे : भाजप हे देशावर आलेलं मोठे संकट आहे. त्यांना दूर केले पाहिजे. तुम्ही कितीही ईडी लावा, सीबीआय लावा काहीही झालं तरी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. जर तुम्ही साथ दिली तर पुढचे मुख्यमंत्रीही उद्धव ठाकरेच होणार’, अशी भावनिक साद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली.

मात्र पवारांच्या या आवाहनावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा पंढरपूरला दाखवून दिलेच आहे. आता परत देगलूर बिलोलीलाही दिसेल. बाकी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही’, असं ट्वीट करुन भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधलाय.

दरम्यान, केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. तसेच, ज्याच्या हातात सत्ता दिली त्यांनी शहराचं वाटोळं केलं. त्यांना खड्यासारखं बाजूला करा. ज्यांनी शहर घडवलं त्या राष्ट्रवादीच्या हातात पुन्हा सत्ता द्या, असंही पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा