InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

‘अजूनही खातेवाटपाचा पत्ता नाही. लवकरच होईल याशिवाय कुठलंही उत्तर महाविकासआघाडीकडे नाही’.

मोठ्या दणक्यात शपथविधी झाला, सरकार आलं. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला. पण अजून खातेवाटपाचा पत्ता नाही. मंत्री आहेत. पण खाती नाहीत. स्थगितीच्या आणि फेरआढाव्याच्याच केवळ घोषणा झाल्या. त्यामुळे हे सरकार काम कधी करणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शपथ घेऊन आणि महाविकासआघाडीचं सरकार येऊन बारा दिवस उलटून गेले. पण अजूनही खातेवाटपाचा पत्ता नाही. लवकरच होईल याशिवाय कुठलंही उत्तर महाविकासआघाडीकडे नाही.

गृह आणि नगरविकासच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडीच्या खातेवाटपाचं घोडं अडलंय. राष्ट्रवादीला गृहखातं किंवा नगरविकास खातं हवंय पण शिवसेना ते सोडायला तयार नाही.यंदाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विभागवार चर्चा आणि प्रश्नोत्तराचा तास नसेल, असं सांगण्यात आलंय. ठाकरे सरकारनंही सत्तेवर आल्यापासून स्थगिती आणि आढाव्यापलीकडे काही केलं नाही.

Loading...

मंत्री आहेत पण खाती नाहीत, दालनं आहेत पण कामं नाहीत अशी परिस्थिती आहे. खातेवाटपाचा पत्ता नाही पण बंगल्यांचं वाटप मात्र तातडीनं झालं. सरकार काम करायला सुरुवात करणार तरी कधी ? हा नोकरशाहीबरोबरच जनतेचाही प्रश्न आहे.

- Advertisement -

 

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.